अमळनेर : धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शाह पिरबाबांची उर्स यात्रा दरवर्षी ऊर्दू महिन्याच्या ५ मोहरम रोजी उत्सवात भरते यावर्षी ही यात्रेचा कार्यक्रम अश्या प्रमाणे आहे मोहरमच्या चार तारखेला म्हणजे ११ जुलै गुरुवार रोजी संदल आणि मोहरमच्या पाच तारखेला म्हणजे १२ जुलै शुक्रवार रोजी उर्स यात्रा साजरा होणार आहे
तालुक्यातील धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शाह पिरबाबा हे हिंदू मुस्लिम समाजाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व एकतेचे प्रतिक आहेत दरवर्षी या उर्स यात्रेसाठी गुजरात मध्यप्रदेश सह महाराष्ट्र राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येतात उर्स यात्रेत दूचाकी व चार चाकी वाहने येताना सावकाश यावे आणि आपले वाहन पार्किंग मध्ये लावावी असे आव्हान धार येथील मुजावर कमिटी तर्फे करण्यात आले आहे