अमळनेर येथे ग्रा.पं. कर्मचारी युनियनची बैठक संपन्न…
अमळनेर:- विविध प्रलंबित मागण्यासाठी ९ मार्च रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्धार मोर्चा आयोजित करण्यात आला असून अमळनेर येथे ग्रा.पं. कर्मचारी युनियनची बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य ग्रा.पं. कर्मचारी युनियनची बैठक काल पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली. 9 मार्च रोजी विधानभवन मुंबई येथे निघणाऱ्या निर्धार मोर्चाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. मारवड ग्रा.पं.चे लिपीक सुभाष पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना मुंबई मोर्चा संबधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिष पाटील, जिल्हा सचिव प्रदिप महाजन अमळनेर तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील ता.उपाध्यक्ष रविंद्र पाटील, पं.स. लिपीक अनिल पाटील, के.डी. पाटील, सतिष पाटील तसेच तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.