
अमळनेर:- शहरातील नांदेडकर सभागृहात १६ जुलै रोजी दुपारी ४ : ०० वाजता येथे अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत तसेच पक्ष बांधणी व विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे तरी अमळनेर विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त कार्यकर्ते – पदाधिकारी व सहकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमळनेर तालुकाध्यक्ष सचिन पाटील व शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी केले आहे.

