
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथे किरकोळ वादातून एकाला लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीने मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद मारवड पोलिसांत देण्यात आली आहे.
याबाबत चाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार १३ रोजी सदर महिला आणि कुटुंबीय घरी असताना गावातील दुर्गेश भानुदास पाटील आणि दत्तात्रय भानुदास पाटील हे दोघे आले आणि त्यांच्या हातातील लोखंडी रॉड आणि उलट्या कुऱ्हाडीने महिलेच्या पतीला मारल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत फिर्यादी महिलेचा हात पकडुन अंगावर ओढत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच महिलेच्या मुलीला ही मारहाण केली. त्यावरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफखान पठाण हे करीत आहेत.

