अमळनेर:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या “चलो वार्ड चलो पंचायत” अभियानांतर्गत जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने “चलो वार्ड चलो पंचायत” मोहीमेचा शुभारंभ दि.22 जुलै रोजी अमळनेर येथे करण्यात आला. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव पवन मजीठीया यांच्या अध्यक्षतेखालील तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव किरण पाटील,तुषार संदानशिव, जळगाव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे , के. डी. पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, गजेंद्र साळुंखे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सुर्यवंशी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत “चलो वार्ड चलो पंचायत” अभियानाची सुरुवात करण्यात आली. युवक काँग्रेस या अभियानाच्या माध्यमातून लोकांची मतदार नोंदणी, इतर शासकीय योजना मोफत जनतेपर्यंत पोहचवणार असुन जे काही स्थानिक नागरिकांच्या समस्या शिक्षण, आरोग्य, रोजगार संबंधित असतील त्यांना वाचा फोडण्याचे काम युवक काँग्रेस करणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पाटील यांनी तर अझहर सय्यद, संदीप घोरपडे, के. डी. पाटील, बी. के. सुर्यवंशी,किरण पाटील, पवन मजीठीया यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन सागर सैंदाणे यांनी तर आभार तुषार संदानशिव यांनी मानले. यावेळी महेश पाटील, विनोद पाटील, जयेश सोमवंशी, अझहर सय्यद, कुणाल चौधरी, हर्षल पाटील,जयेश पाटील, राहुल पाटील, राजु भाट, रणजित राजपूत, दिलीप वंजारी, किशोर पाटील , गौरव देशमुख, संजय चौधरी, सोनु सुर्यवंशी आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.