अमळनेर :- मुख्य रस्ते तसेच शहरातील विविध बँकेच्या आवारात बेशिस्त पणे वाहन लावणाऱ्या ३९ वाहनांवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून २४ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून १५ वाहनधारकांवर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध बँका व वर्दळी च्या ठिकाणी वाहन चालक बेशिस्त पणे वाहन लावण्यात येत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे तीन पथक तयार करून शहरातील विविध भागात त्यांची नेमणूक करण्यात आली होती.त्यानुसार बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ३९ वाहनांवर २४ हजार ४०० प्रमाणे दंडात्मक कारवाई तसेच १२ वाहनांवर भादवी कलम २८५ व ३ वाहनांवर भादवी कलम २८१ प्रमाणे न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पथकात पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे,भगवान शिरसाट, भैय्यासाहेब देशमुख,सहायक फौजदार राजेंद्र कोठावदे,पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील,संदेश पाटील,विजय भोई, लक्ष्मीकांत शिंपी, भूषण परदेशी, मयूर पाटील आदींचा समावेश होता.दरम्यान पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांनी मुख्य रस्ते तसेच चौकात वाहतुकीला अडथडा निर्माण करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.