अमळनेरातील प्रवाश्यांचाही समावेश,सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अमळनेर-मुंबईकडून गुजरात मार्गे अमळनेर कडे येत असलेल्या खान्देश एक्सप्रेस (रेल्वे गाडी क्रमांक 09051) यामधील थ्री तयार वातानुकूलित बोगीतून 15 प्रवाश्यांच्या बॅगा लंपास झाल्याची घटना घडली असून यात अमळनेरातील काही प्रवाश्यांचाही समावेश आहे.वातानुकूलित बोगीतून बॅगा गेल्याने या गाडीमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदर गाडी दि 27 रोजी रात्री साडेबारा वाजता दादर स्थानकावरुन निघाली असता बेस्तान स्थानकावर आल्यानंतर सदर बॅग लंपास झाल्यात यात अमळनेर येथील सी ए नीरज अग्रवाल यांच्यासह येथील इतर प्रवाश्यांच्या देखील बॅग लंपास झाल्या आहेत,नीरज अग्रवाल यांची बॅग व मोबाईल देखील चोरीस गेला आहे.दरम्यान या गाडीत नवसारी ते बारडोली दरम्यान आरपीएफ पुरविला गेला नसून गेल्या 15 दिवसात 5 ते 6 वेळा अश्या घटना घडल्या आहेत.याबाबत नीरज अग्रवाल यांनी रेल्वेकडे तक्रार नोंदवली असून रेल्वे पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच प्रवाश्यांनी देखील या गाडीतून प्रवास करताना समानाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.