अमळनेर-येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय अमळनेर येथे महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत काल दि 3 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय अधिकारी महादेव खेड़कर तसेच तहसिलदार रूपेश कुमार सुराणा हे होते,उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांनी सर्व उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिक संघाच्या सभासद यांना सदर योजने बाबत मोलाचे मार्गदर्शन केले आणि सदर योजनेचे अर्ज भरून घेतले.पुज्य सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील तसेच सचिव एस एम पाटील आणि पुज्य सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर याचे सर्व सभासद हजर होते.