अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील एकाच्या शेतात बसविलेल्या २० हजार रुपये किमतीच्या दोन सोलर प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रभान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,त्यांनी शेतात ९ सोलरप्लेट बसविलेल्या होत्या.त्यापैकी २० हजार रुपये किमतीच्या दोन सोलरप्लेट २५ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे दिसून येत असून अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.