अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु. येथील ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित कै.सु.आ पाटील माध्य. विद्यालय येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक.संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाने शालेय गणवेश वितरण तसेच डिजिटल कक्ष उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्रामविकास मंडळ नवलनगरचे प्रशासकीय अधिकारी भटू तुळशी पाटील, सहा. प्रशासकीय अधिकारी राजू निबाजी भालेराव, पिंपळे खु. गावाचे लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता ५ वी चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शालेय गणवेश वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते डिजिटल कक्षचे उद्घाटन करण्यात आले.सहा. प्रशासकीय अधिकारी राजू निंबाजी भालेराव यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न मध्ये जलेबी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ निकम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ शिक्षक चंद्रकांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ शिक्षक, दगडू पाटील व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.