अमळनेर:- गुजरात येथे बहुतेक ठिकाणी अत्रिवृष्टी मुळे गुजरात मध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे २८ रोजी अमळनेर रेल्वे स्थानकावर बराऊनी-अहमदाबाद एक्स्प्रेसला ५ तासांसाठी अमळनेर स्थानकावर थांबून राहावे लागले.
यात लहान मूले, वृध्द महिला प्रवासी व कामगार वर्ग असे १५०० ते २ हजार प्रवासी असताना यांचे जेवणाचे हाल होत आहेत म्हणून रेल्वेचे वाणिज्य अधीक्षक रवी पांडे यांनी रोटरियन व रेल्वे स्थानिक सलागर समितीचे प्रितपाल बग्गा यांना कळवले. प्रवाशांची गैरसोय व हाल पाहता रोटरीची तत्काळ मीटिंग बोलावून सुमारे २००० प्रवाशांसाठी अन्न व आरओ पाण्याची सोय करण्यात आली. सदर वाटप व व्यवस्थेसाठी रोटरी प्रेसिडेंट ताहा बुकवाला,रोटरी मेंबर सुहास राणे, चेलाराम सेनानी,रोहित संघवी,सौरभ जैन, वृषभ पारख, किशोर लुल्ला, ईश्वर सेनानी, रौनक संकलेचा, प्रतीक जैन यांनी परिश्रम घेतले व स्टेशन अधीक्षक अनिल शिंदे, स्टेशन ट्रॅफिक निरीक्षक सिंह, व आरपीएफ स्टाफ, लाईनमन स्टाफ व काही इतर जुने रेल्वे कमिटी सदस्य यांनी देखील वाटप व व्यवस्थेसाठी मदत करून, रेल्वेला आणि गरजू प्रवाशांना होत असलेली रोटरीची मदत कौतुकास्पद असल्याचे व प्रवाशांची सोय झाल्याचा समाधान व्यक्त केले.
दरम्यान लायन्सने देखील नाश्ता, चहा, पाणी पुरविले. यात दोन्ही क्लबच्या या उत्कृष्ट कार्याची प्रवाशांनी प्रशंसा केली असून या आपत्कालीन परिस्थितीत लायन्स क्लबने सामाजिक जबाबदारी निभावून एक आदर्श स्थापित केल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सी. ए. अजय हिंदुजा,विनोद अग्रवाल, ट्रेझरर महेश पवार,सदस्य योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, प्रसन्ना जैन, प्रितपाल बग्गा, प्रशांत सिंघवी, अनिल रायसोनी, दिलीप गांधी आदी राजू नांढा, जितेंद्र जैन, राजेश शाह, जितेंद्र पारख, महेंद्र पाटील रेल्वे सल्लागार समितीचे डॉ. संजय शाह उपस्थित होते.