अमळनेर:- सरस्वती विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करून शिक्षक दिवस साजरा केला. २६ विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी स्वतः शिक्षक होत वर्गांवर अध्यापनाचे कार्य केले.तर शिक्षकांचा पुष्प देवून ऋण व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ,साने गुरुजी ,यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. शिक्षकाचे जीवनातील महत्त्व मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तर विद्यार्थी मुख्याध्यापिका कु.गायत्री नेरकर सह शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
वर्गावर अध्यापनाचे कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मुख्याध्यापक रणजित शिंदे व शिक्षकवृंदाने कौतुक केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्कीट वाटप करण्यात आले.शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदा पाटील, सौ.संगीता पाटील, सौ गीतांजली पाटील, ऋषिकेश महाळपुरकर यांचेसह संस्थेचे सौ.पूनम पाटील, सौ.शितल पाटील,किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.