अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतिश पारधी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी कु. हर्षदा पाटील हिने शिक्षक दिनानिमित्त एका कवितेतून शिक्षकाविषयी विचार मांडले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा. विजय पाटील, मंजुषा गरूड, सचिन पाटील, सचिन साळुंखे, दिपक पाटील विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.