अमळनेर:- येथील काँग्रेस कमिटीची बैठक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे घेण्यात आली. या बैठकीत तालुका काँग्रेसची गटबाजी मात्र चव्हाट्यावर आली आहे. तसेच जागा काँग्रेसला सुटेल असे त्यांचे नेते सांगत असले तरी सदर बैठकीवेळी सभागृहातील पहिल्या चार रांगा जेमतेम भरल्या होत्या.
यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार हे उपस्थित होते. तसेच जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, सुभाष जाधव, अनंत परिहार यासोबत विधानसभेसाठी इच्छुक के. डी. पाटील, संदीप घोरपडे यांची देखील उपस्थिती होती. मात्र यावेळी डॉ. अनिल शिंदे, व किसान काँग्रेसचे नेते सुभाष जिभाऊ हे अनुपस्थित होते. तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात बूथ प्रमुखांचे महत्व व त्याच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. त्यानंतर मनोज पाटील यांनी तालु का व शहर काँग्रेस कमिटीची भूमिका स्पष्ट करताना आम्ही महाविकास आघाडीचे पाईक असून, तंतोतंत आघाडी धर्म पाडणार असल्याने, आमदारकीची शिफारस कोणालाही झाली तरी काँग्रेस पक्ष भक्कमपणे त्याच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभा राहण्याचे सांगितले. त्यानंतर लोकसभेच्या मतदाना वेळी उत्कृष्ट प्रकारे बूथ सांभाळल्याबद्दल शोभा गढरे व चतुर्थश्रेणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल नगरसेवक राजू संदानशिव यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यात प्रसाद कापडे, विवेक पाटील, तुकाराम चौधरी, लोटन पाटील, यांनी समस्या मांडल्या त्याचे निराकरण जिल्हाध्यक्षांनी केले. त्यानंतर सुभाष जाधव यांचे भाषण झाले. शेवटी संदीप घोरपडे यांनी नाट्यगृह बैठकीस मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे बी.के सूर्यवंशी यांनी त्यांचे विशेष आभार मानले. बैठकीस शांताराम पाटील, गोकुळ बोरसे, काकाजी देशमुख, प्रा शाम पवार, राजू फाफोरेकर, गजेंद्र साळुंखे, मेघराज पवार, अलीम मुजावर, तुषार संदानशिव, राजू संदानशिव, महेश पाटील, विठ्ठल पवार, अशोक पाटील, पार्थ पाटील, विवेक पाटील, प्रवीण जैन, अनिल पाटील, वसंतराव पाटील, शहर महिला अध्यक्ष नयना पाटील, वैशाली मोरे, तनवीर शेख, अनवर खाटीक, अल्ताफ शेख, विवेक पाटील, देविदास पाटील, रोहिदास दाजी, लोटन अण्णा चौधरी, दिलीप पाटील, राजू भाट, प्रवीण जैन, विश्वास पाटील, अमित पवार, बंशीलाल पाटील, डॉ. एन बी बागुल, कैलास कोळी, भगवान संधान शिव, विशाल परदेशी, गुलाब पाटील, दिनकर पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, पुनीलाल पाटील, पवन शिंदे, सलीम शेख, गौतम भोई, ज्ञानेश्वर कोळी, मधुकर पाटील, अनिल पाटील इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पाठी नाही जनाधार आणि म्हणे आम्ही उमेदवार….
काँग्रेसच्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांची संख्या नगण्य असल्याची चर्चा असून डॉ. अनिल शिंदे व प्रा. सुभाष पाटील यांनी सदर बैठकीला आम्हाला बोलवण्यात आले नसल्याचे सांगितले. काँग्रेसमधील पाठीशी जनाधार नसलेले व कोणत्याही प्रश्नांवर न लढणारे काही स्वयंघोषित नेते ही आता आमदारकीचे स्वप्न पाहत असले तरी दिल्ली अभी दूर हैं, हे त्यांच्या लक्षात नसेल येत तर नवलच…