
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, येथे गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गांधीजींनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसा याचा मार्ग स्वीकारावा असे त्यांनी आपल्या भाषणातून मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष देवीदास शामराव पाटील, सेक्रेटरी देविदास बारकू पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत देसले उपस्थित होते. गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ.सतिश पारधी यांनी प्रास्ताविक केले तर गांधी विचार संस्कार परीक्षेविषयी मनोगत सागर कोळी या विद्यार्थ्यांने व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार डॉ.संजय महाजन यांनी मानले.







