
अमळनेर:- तालुका स्तरीय खोखो क्रीडा स्पर्धामध्ये १७ वर्ष वयोगटात लोंढवे येथील स्व आबासो एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकाविले. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सदरच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच सम्पन्न झाल्या.
अंतिम सामन्यात लोंढवे विद्यालयाच्या संघाने शहापूर ता. अमळनेर येथिल माध्यमिक विद्यालयाच्या संघाचा ५ गुणांनी पराभव केला. सुनील वाघ यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजयी संघाला मिलिंद पाटील सर,व्ही.डी. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे चेअरमन माजी आमदार डॉ. बि. एस. पाटील,मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

