अमळनेर :- विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतमालाची शासकीय खरेदी झालीच पाहिजे, महाविद्यालयीन मुलांना विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क आणि फी माफ झाली पाहिजे, सरकारी नोकर भरती तातडीने सुरू करा आणि महिला सुरक्षितेत वाढ झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी एक दिवसाचे धरणे करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिलोत्तमा पाटील, उबाठा सेनेच्या ऍड. ललिता पाटील, काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे, शाम पाटील, संजय पुनाजी पाटील, गोकुळ पाटील, विश्वास पाटील,भागवत सूर्यवंशी, किसान काँग्रेसचे प्रा. सुभाष पाटील, सुरेश पिरन पाटील शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, चंद्रशेखर भावसार , गणेश पवार, अशोक पवार, मनोज पाटील,विश्वास पाटील, प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.