न प कामगार संघटनांचे मुख्याधिकारीना निवेदन
अमळनेर :-दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर तातडीने ऑक्टोबर महिन्याचे वेतन, महागाई भत्ता तसेच 7 व्या वेतन आयोगातील 4 था व 5 व्या फरकाची रक्कम तातडीने अदा करावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने अमळनेर न प च्या मुख्याधिकारीना देण्यात आले.
यात म्हटले आहे की दि.31 ऑक्टोबर रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टो. 2024 च्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दि.25 ऑक्टोबर पुर्वी प्रदान करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाने संदर्भिय नमुद परिपत्रकान्वये आदेशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने अमळनेर परिषदेतील सफाई कामगार व कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी यांना दिवाळी सण आनंदात व उत्साहात साजरा करता यावा. याकरीता तातडीने माहे. ऑक्टोबर 2024 चे वेतन तसेच महागाई भत्ता व 7 व्या वेतन आयोगातील 4 थ्या व 5 व्या हप्त्याचा फरकाची रक्कम तातडीने अदा करून कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालावी.कारण दिवाळी हा सण भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा मानला जातो. अमळनेर नगरपरिषदेतील सफाई कामगार यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे व योगदानाचे संपुर्ण देशभरात कौतुक झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अमळनेर दौऱ्याच्या वेळी सफाई कामगारांनी केलेल्या कोरोना काळातील प्रशंसनीय कामगिरी पाहत त्यांच्या सोबत स्नेहभोजन केले होते.यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यात अडचणी येऊ नये.
तसेच सहाय्यक अनुदान प्राप्त न झाल्यास यासाठी 3 महिन्याचे वेतन निधी राखुन ठेवले जाते. यामुळे अडीअडचणी च्या काळात कामगार व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी राखुन ठेवण्यात आलेल्या वेतन निधीतून पगार अदा करणे सोयीचे जाते.तरी आपण तातडीने अमळनेर नगरपरिषदेत सफाई कामगार, कर्मचारी यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर तातडीने ऑक्टोबर महिन्याचे वेतन, महागाई भत्ता तसेच 7 व्या वेतन आयोगातील 4 था व 5 वा फरकाची रक्कम तातडीने अदा करून दिवाळीच्या आनंद साजरा करू द्यावा अशी विनंती यात करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रदेश सदस्य तथा सचिव रघुनाथ आर. मोरे,अध्यक्ष बिंदूकुमार सोनवणे,कार्याध्यक्ष नंदलाल इतवारी तेजी,प्रदेश संघटन मंत्री विकास टिल्लू जाधव तसेच इतर संघटनेचे रुपेश पारे,मुकेश बिऱ्हाडे,विनोद जाधव यांनी केले आहे.