
अमळनेर:- येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी नंदकिशोर योगेश पाटील रा. गलवाडे यांनी एनडीएच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून त्याची ऑल इंडिया रँक 245 आली आहे.

मार्च 24 मध्ये झालेल्या इ.१२ वी परीक्षेत तो विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. इंडिया साठी निवड होणारा नंदकिशोर हा पहिला विद्यार्थी ठरला आहे.
त्याने कोणताही क्लास न लावता सदर यश संपादन केले आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी जैन, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास मोरे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वसंत एस. पाटील खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी व्हाईस चेअरमन नीरज अग्रवाल संचालक मंडळाचे सदस्य डॉ. अनिल शिंदे, हरि भिका वाणी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल आणि सर्व पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापकांनी नंदकिशोरचे अभिनंदन केले आहे.

