पोलिस निरीक्षक विकास देवरे यांचे आवाहन…
अमळनेर:- कोणत्याही व्हाट्सअप ग्रुप मध्ये अथवा सोशल मीडियाच्या ग्रुपवर आचार संहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद असा मजकूर टाकल्यास संबंधित व्यक्ती आणि ग्रुप ऍडमिन जबाबदार असेल त्यामुळे ग्रुपची सेटिंग ओन्ली फॉर ऍडमिन करून घ्यावी असे पत्रक भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आचारसंहिता लागू असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(३)(१) नुसार तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये नोटीस जारी करून २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोणत्याही उमेदवारांच्या विरोधात वैयक्तिक, कौटुंबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असा मजकूर टाकणे अगर पुढे पाठवणे आचार संहितेचा भंग होईल. मतदारांना आकर्षित करण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवणारे संदेश टाकल्यास किंवा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल असे ग्रुप तयार करणे फोटो, विडीओ एडिट करून ते पसरवणे आचारसंहिता भंग होईल. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.