
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन येथील वीस वर्षीय विवाहितेचा बाळंतपणाच्या पाचव्या दिवशी अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवर्धन येथील सपना रोहित भिल (वय २०) हिला २६ रोजी प्रसूतीसाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. २७ रोजी पहाटे १:३० वाजता सिजर होऊन तिने मुलाला जन्म दिला. तिला ३१ रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दुपारी ४ वाजेच्या सुमारास तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी प्रेत पुन्हा हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे नेण्यात आले होते. या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील तेली करीत आहेत.

