प्रशासन पाहतय राजकोट किल्ल्यासारखी दुर्घटना घडण्याची वाट…
अमळनेर:- शहरातील ऑक्टोबर २०१६ मध्ये बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यास ठिकठिकाणी भेगा पडल्या असून काही शिवप्रेमींच्या लक्षात हा प्रकार आला, मात्र नगरपरिषद प्रशासन व ठेकेदार मात्र अद्यापही झोपेत आहेत.
तब्बल पन्नास लक्ष रुपये खर्चून हा पुतळा नाट्यगृहात स्थापित करण्यात आला होता. त्यावेळी या पुतळ्याचे मोठ्या थाटामाटात अमळनेर शहरात आगमन करण्यात येऊन मोठे श्रेय घेण्यात आले होते. राज्यातील अनेक महापुरुषांचे पुतळे वर्षानुवर्ष दिमाखात उभे असताना नाट्यगृहात असलेल्या या पुतळ्यास अवघ्या आठ वर्षात पुतळ्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. तसेच शिवाजी महाराज नाट्यगृहाला असलेले नाव देखील अर्धे खाली पडलेले आहे. अमळनेर नगर परिषदेने नाट्यगृह देखभाल करणे व चालवण्यासाठी एका ठेकेदाराला दिले आहे. मात्र नगरपरिषद आणि ठेकेदार हे मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत काय ? असा सवाल संतप्त शिवप्रेमी विचारत आहेत.