
तालुक्यातील कळमसरे, मंगरूळ व वासरे येथे खुर्च्या व कार्पेटचे वाटप…
अमळनेर:- तालुक्यातील तीन गावात क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण कंपनीच्या अमळनेर शाखेतर्फे अंगणवाडीत साहित्याचे वाटप करण्यात आले.

कंपनीच्या सीएसआर फंडातून हा उपक्रम राबविण्यात आला असून तालुक्यातील कळमसरे, मंगरूळ व वासरे या गावातील अंगणवाडीत लहान मुलांसाठी खुर्च्या, तसेच ऑफिस चेअर, व चटई (कार्पेट) चे वाटप करण्यात आले. यावेळी कळमसरे येथे उपसरपंच जितेंद्र राजपूत, अंगणवाडी सेविका सुशिलाबाई पाटील, मंगरूळ येथे सुपरवाइजर अरुणा थोरात, शिक्षक राजेंद्र पाटील, अंगणवाडी सेविका अनिता पाटील, तसेच वासरे येथे अंगणवाडी सेविका नम्रता पाटील, मदतनीस विमलबाई पाटील यांना क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण कंपनीच्या सभासद ग्राहकांच्या उपस्थिती साहित्य सुपूर्त करण्यात आले. कंपनीचे क्षेत्र व्यवस्थापक पुंडलिक भादवे, शाखा व्यवस्थापक बबलू पिंजारी, उपशाखा व्यवस्थापक कैलास पाटील, तसेच रवी खटार, राहुल पाटील, यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. सर्व अंगणवाडी कर्मचारी व ग्रामस्थांतर्फे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण कंपनीचे आभार मानण्यात आले.







