अट्टल मोटर सायकल चोरटे झाले जेरबंद, नऊ चोरीची वाहने जप्त….
अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथील ग्राम संरक्षक पथकातील सदस्यांची मदतीने अट्टल मोटर सायकल चोरटे जेरबंद केले आहेत.
तालुक्यातील विविध गांवाना ग्राम सरंक्षक पथक स्थापन करण्यात आले असुन सदर ग्राम सरंक्षक पथकातील सदस्यांचे रात्रगस्त करण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. २२ मार्च रोजी जानवे येथे पोलीस पाटील विलास धोंडु पाटील, ग्राम सरंक्षक पथकातील सदस्य विलास बारकु भिल, भैय्या सुरेश भिल, प्रमोद नाना भिल, अनिल संतोष भिल हे गस्त घालीत असतांना दोन संशयित हे दुकान फोडण्याचा प्रयत्न करीत असतांना दोन्ही संशयिताना लागलीच तेथेच थांबवुन तात्काळ अमळनेर पोलीस स्टेशन कडील शासकीय वाहनावरील गस्तीवर असलेल्या पोउनि अनिल भुसारे यांना बोलावुन त्यांच्या ताब्यात दिले. सदर वेळी त्यांच्या कडेस एक होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल व लोखंडी सळई मिळुन आली होती. त्यानंतर दि. २३ रोजी पो.नि. जयपाल हिरे यांनी वरील दोन्ही संशयिताना विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी त्याचे नांव राजु विक्रम खांडेलकर (वय २०), दिपक रविंद्र पाटील (वय २२) दोन्ही रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर असे सांगितले व त्यांनी वर नमुद मोटार सायकल कोणगांव पोलीस स्टेशन जि. भिवंडी (ठाणे शहर) येथुन चोरी केली असल्याचे कबूल केले. व दोन्ही संशयित रात्रीचे अंधाराचा फायदा घेवुन दुकान फोडुन चोरी करणार असल्याबाबत सांगितले. वरील दोन्ही संशयितांना अधिक विचारपुस करता त्यांनी अजुन मोटरी सायकल बाबत माहिती त्या काढुन दिल्या आहेत. त्यात दोन ड्रीम युगा, चार होंडा शाइन, एक सुपर स्प्लेंडर, एक होंडा युनिकॉर्न, एक स्प्लेंडर प्रो आदी गाड्या चोरी केल्याचे कबूल केले.