अमळनेर:- दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांचे प्रशासनाने घरी जाऊन मतदान घेतले. १९० पैकी १७८ मतदारांनी मतदान केले. चार मतदार मयत झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.
८५ वर्षावरील १४९ मतदार असून त्यापैकी १४१ मतदारांनी मतदान केले. ३ मतदार मयत झाले आहेत आणि ५ जणांचे मतदान बाकी आहे. तर ४१ मतदार दिव्यांग असून ३७ मतदारांनी मतदान केले. १ मयत असून ३ मतदारांचे मतदान बाकी आहे.
पिंपळे रोडवरील पद्माबाई देसले या महिलेने पहिले मतदान केले. एकूण दहा पथक नेमण्यात आले होते. त्यात मतदान अधिकारी, कॅमेरामन, शिपाई कर्मचाऱ्यांचा समावेश होता. उर्वरित आठ मतदारांकडे ९ रोजी पथक पोहचणार आहे असेही मुंडावरे यांनी सांगितले.