संविधान बचावासाठी डॉ शिंदे यांना विजयी करा-मनोज पाटील
अमळनेर:- आपली लढाई संविधान बचावासाठी आहे, देशात दलित,अल्पसंख्याक समाज दहशती खाली वावरत आहे, आपण गांधी-नेहरू यांच्या विचारांचा पाईक असल्याने, संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडीचे अमळनेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ अनिल शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन काँग्रेस चे शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले आहे.
डॉ शिंदे यांच्यावर काँग्रेसी विचारधारेचा प्रभाव आहे,त्यांनी पक्षाशी आपल्या विचारांशी कधी ही गद्दारी केली नाही, विद्यमान मंत्री अनिल पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केली,खासदार शरद पवार यांच्यावर अपमानजनक टीका केली हे अमळनेरची जनता विसरली नाही,पवार साहेबांच्या नावावर निवडून गेलेल्या या गद्दाराला अमळनेर ची जनता या निवडणुकीत धडा शिकवेल यात शंका नाही,एकीकडे घडयाळला मत म्हणजे भाजपाला मत आहे तर दुसरीकडे माजी आमदार शिरीष चौधरी हे शिंदे सेनेचे डमी उमेदवार आहेत, आर्थिक विवंचनेत असणाऱ्या चौधरींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक लढवण्यासाठी 10 कोटी दिल्याची चर्चा आहे, तसेच सूतगिरणी साठी शासनाने दिलेल्या 19 कोटी रुपयांवर यांनी डल्ला मारला आहे, स्वतःला पौलादी पुरुष म्हणवून घेणारा स्वयंघोषित कार्यसम्राट माजी आमदार, साडे चार वर्षे अमळनेरमधून गायब असतो,अन निवडणूक आली की,प्रकट होतो,शिंदे सेनेने पुरवलेल्या आर्थिक रसदमुळे पुन्हा एकदा अमळनेर खरेदी करायला निघाला आहे, तेंव्हा मतदार बंधू नो चौधरी याना मत म्हणजे शिंदे सेनेला मत,त्यामुळे शेतकऱ्याचे पैसे खाणाऱ्या या स्वयंघोषित कार्यसम्राट माजी आमदाराच्या प्रचाराला बळी पडू नका,याने ही भाजपाशी गद्दारी केली आहे, अमळनेरची भूमी कधीही गद्दारांना साथ देणार नाही, त्यामुळे अमळनेर शहराच्या व तालुक्याच्या शांततेसाठी काँग्रेसचे डॉ शिंदे यांना विजयी करा, असे आवाहन मनोज पाटील यांनी केले