माजी पं.स. सदस्य प्रविण पाटील यांचा हल्लाबोल
अमळनेर:- अमळनेर शहर व तालुक्याला सुंसस्कृत राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. मात्र तालुक्यातील काही बेणे धारी मंडळी बेणे घेऊन,खंडणी मागून हल्ली मंत्री महोदयांवर आरोप करायला निघाली आहेत.वेगवेगळ्या रस्त्यांचे खोटे व्हिडिओ काही समाजकंटकांकडून वेगवेगळ्या समाज माध्यमांवर पाठविले जात आहेत.
मात्र नामदार अनिल पाटील यांच्या कार्यकाळात सुरू झालेली अनेक विकासकामे त्यांना दिसत नाहीयेत. बेणे घेऊन काम करणाऱ्यांनी एकदा पाडळसरे धरणावर जाऊन व्हिडिओ बनवावा तेव्हा त्यांचे डोळे उघडतील.
अमळनेर शहरात अनेक प्रशासकीय इमारतींचे काम जोमात सुरु आहे.बाजारपेठेत रस्त्यांचे काम सुरू आहे. डी.पी.रस्त्याचे काम सुरू आहे.एकदा या रस्त्यांची कामे पण त्या खंडणी बहाद्दर यांनी पहावी.
या डीपी रस्त्यामुळे शहराच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे.या रस्त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे काँक्रिट,सिमेंट,मेटल आणि मजबुतीसाठी आवश्यक असलेले साहित्य वापरले जाणार आहे.
पण फक्त बेणे घेऊन मंत्री व विद्यमान आमदार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या खंडणी बहाद्दर याने सुरू केले असून जनता या खंडणी बहाद्दर यांना कंटाळली आहे.
मतदारसंघातील चौफेर होत असलेला विकास जनतेला दिसत असून कुणाच्या भूलथापांना जनता बळी पडणार नसून ना.अनिल पाटील यांच्यामागे उभी राहणार आहे असे प्रविण वसंतराव पाटील (माजी पंचायत समिती सदस्य अमळनेर) यांनी मत व्यक्त केलं आहे.