मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जनजागृती रॅलीला केले संबोधित
अमळनेर : आपल्याला आपला राज्यकर्ता निवडण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत त्यामुळे १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने निस्वार्थी भावनेने मतदान करा असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी न पा तर्फे काढण्यात आलेल्या जनजागृती रॅली ला संबोधित करताना केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रम अंतर्गत नगरपरिषदेपासून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सुरुवातीला अग्निशमन दलाच्या मोटारसायकली व छोटे वाहन त्यावर मतदान जनजागृतीचा फलक लावण्यात आला होता. पालिकेपासून रॅली निघून सुभाष चौक , पाच कंदील चौक , आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्याठिकाणी नागरिकांना सामूहिक शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमचंद संदानशिव यांनी केले.
रॅलीत मुख्याधिकारी तुषार नेरकर , उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण , बांधकाम अभियंता डिगंबर वाघ ,सुनील पाटील , स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , किरण कंडारे , अग्निशमन अधिकारी गोसावी , न पा शिक्षण मंडळाचे सुनील पाटील यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी , सफाई कर्मचारी , महिला , न पा शाळेचे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.