अमळनेर – येथील ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर येथे गट मुख्यालय औरंगाबाद येथील ब्रिगेड यु.के.ओझा यांनी वार्षिक तपासणी निमित्त भेट देवून कार्यालयीन कामकाजाची पूर्ण पाहणी केली.
सर्वप्रथम त्यांना गार्ड तर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सर्व एनसीसी कॅडेट यांना शिकवणारे स्टाफ तसेच एएनओ यांना एनसीसी कॅडेट अधिक प्रमाणात सैन्यात कसे भरती होतील याविषयी मार्गदर्शन केले. 49 महाराष्ट्र बटालियन मध्ये वर्षभरात झालेल्या विविध कँप विषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. कँप मध्ये काय काय अडचणी येत आहेत तसेच विविध प्रकारात यश मिळवणाऱ्या कॅडेट्सचे त्यांनी यावेळी कौतुक केले. बटालियनचे दैनंदिन कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळेस अमळनेर बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल अमित रे, प्रशासकीय अधिकारी सुभेदार मेजर गजेसिंग तसेच सिविल स्टाफ, सीआय स्टाफ व एएनओ उपस्थित होते.