गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यासाठी साडेचार कोटी निधीस मंजुरी, भूसंपादन मोबदलाही मिळाला,इतर गावांच्या भूसंपादनालाही दिली गती
अमळनेर-मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार तथा राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सुरवातीपासूनच सात्री गावाच्या पुर्नवसनाला गती देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असुन त्यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस गती मिळाली आहे, बाधित शेतकऱ्यांना भूसंपदानाचा मोबदलाही मिळाला आहे.आणि पुनर्वसन प्रक्रियेसाठी कालावधी जाणार म्हणुन गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यासाठी साडेचार कोटी निधीस मंजुरी देखील मिळाली असल्याची माहिती सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी दिली.
एवढेच नव्हे तर निम्न तापी प्रकल्पात बाधित ठरणाऱ्या अमळनेर तालुक्यातील 12 गावांच्या भूसंपादनालाही पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गती दिली असल्याचे बोरसे यांनी सांगितले.पुनर्वसन खाते त्यांच्याकडे असल्यानेच लाभ झाला असताना मात्र विरोधी उमेदवार असलेल्या माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधु डॉ रविंद्र चौधरी यांना निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण आणि पुनर्वसन प्रक्रिया याबद्दल काहीच ज्ञान नसल्यानें ते उलटसुलट आरोप मंत्री महोदय यांच्यावर करीत असल्याचा टोला ही त्यांनी लगावला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा ग्रामिण भागात प्रचार दौरा पूर्ण झाला असून यादरम्यान धरणाच्या व पुनर्वसन कामाला दिलेली गती आणि मतदारसंघात केलेला शास्वत विकास यामुळे सात्री सह परिसरातील गाबामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे बोरसे यांनी सांगितले.आमचे सात्री सह इतर गावे निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असून या गावाचे विस्थापण होण्यासाठी आधी गृहसंपादन आवश्यक आहे.मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने सात्री च्या गृह संपादन कामाला गती मिळावी म्हणून
3 कोटी 12 लक्ष,26 हजार 559 एवढा निधी जानेवारी 2024 मध्ये पैसे उपलब्ध झाले आहेत.त्याचबरोबर पुनर्वसन साठी तांत्रिक कालावधी जाणार त्या कालावधीत सात्री गावकऱ्यांना पावसाळ्यात बोरी नदीच्या अडचणीमुळे पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यासाठी 4 कोटी 55 लक्ष 39 हजार किमतीच्या पावणे पाच कि.मी.रस्त्याला मंजूरी मिळवली असून त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे.तसेच यापूर्वी निम्न तापी प्रकल्पाच्या बुडिताखाली येत असलेल्या सात्री येथील शेतकरी बांधवांच्या शेत जमिनी संपादन देखील करण्यात आल्या असून संबंधित बाधीत शेतकरी बांधवाना 3 कोटी 28 लक्ष एवढा भूसंपादन मोबदला देखील अदा करण्यात आला आहे.म्हणजेच मंत्री अनिल पाटील हे आमच्या गावाला न्याय देण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत हे स्पष्ट आहे.पावसाळ्यात पूर परिस्थितीत नदी ओलांडून जावे लागते म्हणून पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून पॉवर बोट देखील मंत्री अनिल पाटील यांनी उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील 12 गावांच्या भूसंपादनालाही दिली गती
मंत्री अनिल पाटील यांनी सात्रीच नव्हे तर तालुक्यातील धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या 12 गावांच्या भूसंपादन प्रस्तावास देखील गती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून यासाठी प्रत्यक्षात 2 कोटी,33 लक्ष 13 हजार 616 रुपये एवढा
निधी देखील भूसंपादन कार्यालयात जमा करण्यात आला आहे.तालुक्यातील कामतवाडी,मुंगसे,सावखेडा,मठगव्हाण,दोधवत,दापोरी खुर्द,धावडे, नालखेडा, गंगापूरी,रुंधाटी,खापरखेडा प्रगणे जळोद आणि निंभोरा आदी गावांचा यात समावेश असल्याचे बोरसे यांनी सांगितले.
पाडळसरे धरण आणि या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावांचे पुनर्वसन हा अतिशय मोठा प्रश्न असताना मंत्री अनिल पाटील हे अभ्यासु आणि क्रियाशील व्यक्तीमत्व असल्यामुळेच दोन्ही कामांना गती मिळाली आहे.ज्यांना याबाबत काहीच अभ्यास नसेल त्यांनी ते बोलूच नये आणि जनतेची दिशाभूल देखील करू नये आमचे गाव आणि आमचा संपूर्ण परिसर मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी असुन सर्व गावातून मोठे मताधिक्य देणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.