बाहेरून आलेल्या लोकांनाही मतदारसंघ सोडण्याच्या सूचना,
अमळनेर:- अमळनेर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारतोफा काल सायंकाळी थंडावल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरून आलेल्या लोकांनीही सहा वाजेपासून मतदारसंघ सोडण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या.
काल १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ पासून सर्व उमेदवारांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडियावरूनही जाहिराती, प्रचार करता येणार नाही. त्यामुळे कालपासून उमेदवार व कार्यकर्ते आर्थिक व इतर नियोजनाच्या तयारीला लागले आहेत.
बाहेरून आलेल्या लोकांनाही मतदारसंघ सोडण्याच्या सूचना
प्रचाराला सायंकाळी सहानंतर बंदी असल्याने बाहेरील मतदारसंघातून प्रचारासाठी व इतर कामांसाठी आलेल्या व आणलेल्या लोकांनाही सायंकाळी सहा नंतर मतदारसंघ सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले आहे.
पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त,
अमळनेर मतदारसंघात १५ पोलीस अधिकारी, ३४५ कर्मचारी, २५० होमगार्ड यांच्यासह एक एसआरपीएफ तुकडी व एक आयटीबीपीची कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे अमळनेर पोलिस ठाण्याचे पीआय विकास देवरे यांनी सांगितले आहे.