गावरान जागल्या संघटनेची प्रशासनाकडे मागणी
अमळनेर(प्रतिनिधी):- चालू खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापूस,मका, ज्वारी,सोयाबीन,तुर या शेतमालाला किमान आधारभूत किंमतीत विक्रीसाठी शासकीय शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी गावरान जागल्या संघटनेचे अध्यक्ष यांनी प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्याकडे १४ नोव्हेंबर रोजी केली असून पुढील कार्यवाही साठी स्थानिक प्रशासनाकडून, जिल्हाधिकारी यांच्याकडे हे पत्र पाठविण्यात आले आहे.
संघटनेने मागणी केली आहे की,१५ डिसेंबर पासून तालुक्यात नियमित व अखंडितपणे खरेदी केंद्र सुरू करावे.शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव न मिळाल्यास किंवा त्यांना न्याय न मिळाल्यास शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची रक्कम शेतमाल विक्री दिनांकापासून १६ % व्याजासकट शेतकऱ्यांना अदा करावी असे निवेदनात म्हटले आहे.