अमळनेर:- शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलला 26 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील एमएमआरडीए ग्राउंडवर बीकेसी सेंटर येथे स्टार एज्युकेशन अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले.
अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल या शाळेला बेस्ट स्कूल हा अवॉर्ड देण्यात आला. हा अवॉर्ड गुणवत्तेच्या आधारावर होता. सदर अवॉर्ड देण्यापूर्वी स्टार एज्युकेशनच्या टीमने शाळेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल पूर्ण माहिती घेऊन व तपशील मागवून परीक्षकांनी स्वामी विवेकानंद शाळेची बेस्ट सीबीएसई स्कूल म्हणून निवड केली. पारितोषिक घेण्यासाठी शाळेचे प्राचार्य विनोद अमृतकर उपस्थित होते. शाळेच्या या यशाबद्दल व यशस्वी वाटचालीबद्दल शाळेचे मार्गदर्शक बजरंगलाल अग्रवाल, चेअरमन डी डी पाटील, संस्थापक नीरज अग्रवाल, अध्यक्षा सीतिका अग्रवाल, ममता अग्रवाल व आचल अग्रवाल यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.