अमळनेर:- तालुक्यातील लोणखुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी डॉ. शशिकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच मीनाताई भील, ग्रा. सदस्य हिलाल पाटील, निलाबाई पाटील, सुमनताई भील, ललिता पाटील, प्रतिभा पाटील, संगणक परीचालक अशोक पाटील, ग्रामसेवक विजय पाटील, तलाठी भुपेष पाटील, अध्यासी अधिकारी विठ्ठल पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, माजी सरपंच शिवाजी पाटील, माजी पो. पाटील भालचंद्र पाटील, वि. का. सो. माजी सदस्य गुलाब पाटील, दिनेश पाटील, समाधान शिंदे, सागर शिंदे, बी. जी. पाटील सर, विनोद पाटील, आबा पाटील, उदय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रविण पाटील अविनाश पाटील, नवल महाजन, दिलीप पाटील, सचिन शिंदे, भटू पाटील, महेंद्र शिंदे, रावसाहेब शिंदे, चुनीलाल पाटील, परमेश्वर पाटील, संभाजी पाटील, बाळू मोरे, सुखदेव पाडवी, रहीम शाह, किशोर भील, देवचंद भील, अशोक भील, सतिलाल भील, प्रधान माळी, साहेबराव महाजन, तकदीर शाह, राजू मदारी, संजय भील, आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच प्रतिभा पाटील यांच्यासह सर्व उपस्थितांनी डॉ. शशिकांत पाटील यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. डॉ. शशिकांत पाटील यांचे सारखे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व गावाच्या सरपंच पदावर विराजमान झाल्यावर गावाच्या विकासाला निश्चितच नविन दिशा मिळुन योग्य ती चालना देण्याचे कार्य करेल असे मत अभिनंदनपर शुभेच्छा देतांना अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी मांडले तर डॉ. शशिकांत पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आणि ग्रामस्थाचे सरपंच पदी आरूढ होण्यास सहकार्य केल्याबद्दल आणि परीश्रम घेतल्याबद्दल ऋण व्यक्त करत आपल्या मनोगतातून पुढील समाजकारणाची दिशा स्पष्ट केली.