अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथे धुळे रोड लगत असलेल्या नाल्यावर व कंडारी खुर्द येथे तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
हा वनराई बंधारा या परिसरातील जलपातळी वाढीसाठी उपयुक्त ठरेल तसेच पशुधनास पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध होईल. त्याचबरोबर शासनाचा पाणी आडवा – पाणी जिरवा या उपक्रमात देखील हातभार लागेल. असे मत उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी व्यक्त केले. प्रभारी तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
कंडारी खुर्द येथेही केले श्रमदान…
तालुक्यातील कंडारी खुर्द येथे म्हसले रस्त्यावरील नाल्यावर लोकसहभाग व कृषी विभागाच्या श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी शेतकरी योगेश पाटील, उमेश पाटील, मधुकर पाटील राजेंद्र पाटील, सतीलाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विष्णू पाटील, यांच्यासह प्रभारी तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक प्रविण पाटील, वंजारी, कृषी सहाय्यक अनिकेत सूर्यवंशी, आर एच पवार, दीपक चौधरी, एम जी पवार, निलेश पाटील, चेतन चौधरी, नवल वाघ, राजेश बोरसे यांच्या श्रमदानाने व सहकार्याने वनराई बंधारा तयार करण्यात आला. नाल्या मधून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून वनराई बंधाऱ्यामुळे जागेवर थांबवून पाणी अडविले जाणार असून पाणीसाठा दीर्घकाळ साचल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. परिणामी सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकाचे उत्पादन वाढणार आहे.