पौर्णिमेला महाप्रसाद वाटप करून होईल सांगता
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथिल दत्त भगवान मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा वर्धापन दिनानिमित्त हभप मोठेबाबा व कपिलेश्वर मंदिराचे मठाधीपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांच्या आशिर्वादाने हभप व हभप अंबादास महाराज यांच्या प्रेरनेने गुरुदत्त मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी सालाबादप्रमाणे यावर्षी ही रविवारी दिनांक 8 डिसेंबर पासून पौर्णिमेच्या रविवारी दिनांक 15 डिसेंबर या कालावधीत संगीतमय श्रीमद भागवत कथेसह गुरुचरित्र पारायण, अखंड विठ्ठल नामजप व अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील नवसाचा गणपती मंदिरापासून भागवत कथेचे भव्यदिव्य अशी शोभायात्राने होईल. प्रभू दत्त भगवान जयंती निमित्त पांच नद्याच्या पाण्याने पंच्यामृत अभिषेक होईल, धुनी व गोमूत्र शिंपळून कथा मंडप शुद्धीकरण करून प्रांतकाळी संगीतमय भागवत कथेचे निरूपण प.पू.कृष्णदास महाराज नांदेड (राममंदिर) यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. दैनदिंन कार्यक्रमात पहाटे 4:30 ते 5 यावेळी काकडा आरतीने होईल, सकाळी 5 ते 6 रामधून दुपारी 2 ते 5 संगीतमय श्रीमद भागवत कथा निरूपण होईल , सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, भारुड व रात्री 8 ते 10 यावेळी जाहीर हरीकीर्तन होईल असे दैनंदिन आठ दिवस नित्य कार्यक्रम होतील. त्यासाठी आळंदी येथिल नामवंत कीर्तनकार कीर्तनरूपी सेवा देणार आहेत ते पुढील प्रमाणे रविवार ८ डिसेंबर रोजी ह.भ.प अतुल महाराज नारणेकर, सोमवार ९ डिसेंबर रोजी ह.भ.प भानुदास महाराज भुसावळकर, मंगळवार १० डिसेंबर रोजी ह.भ.प पंकज महाराज पवार अमरावतीकर, बुधवार ११ डिसेंबर रोजी ह.भ.प अमोल महाराज घुगे अकोला, गुरूवार १२ डिसेंबर रोजी ह.भ.प. लक्ष्मण शास्त्री महाराज खेडीभोकरकर , शुक्रवार १३ डिसेंबर रोजी ह.भ.प. पंकज देशमुख महाराज हिंगोलीकर .शनिवार १४ डिसेंबर रोजी दुपारी विठ्ठल रुक्मिणी मुर्त्या व दत्त भगवानच्या पादुका, गीता -भागवत ग्रंथ, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेच्या सजविलेल्या पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येईल व रात्री
ह भ.प चकोर महाराज शास्त्री अकोटकर यांचे कीर्तन होईल तर रविवार १५ डिसेंबर रोजी सकाळी 8 :30 ते 10:30 यावेळी ह.भ.प. किशोर महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होऊन लाही काला महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता होईल तरी पंचक्रोशीतील समस्थ भाविक भक्तांनी उपस्थित राहून ज्ञानदानाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त दत्त मंदिर ट्रस्ट, दत्त भगवान समूह व कळमसरे ग्रामस्थ यांनी केली आहे.