
अमळनेर:- निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट व शरद पवार गट असे २ गट पडले होते. याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह व नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्याने अजित पवार गटातर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष येणाऱ्या काळात काम करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे,विनोद कदम, एल.टी.पाटील,बाळू पाटील, रणजित पाटील,राजेश पाटील, अलका पवार,भारती शिंदे, शिवाजी पाटील,गौरव पाटील, निलेश देशमुख, राहुल गोत्राल, तसेच सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

