अमळनेर:- बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांनी तालुक्यातील पिळोदा गावातील जिल्हा परिषद शाळा तसेच बालाजी विद्यालय एकत्रित पणे बालविवाह मुक्त भारत शपथ घेण्यात आली.
या अभियाना अंतर्गत गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली त्यावेळी गावातील सरपंच भारती पाटील उपसरपंच पदमाबाई पारधी, ग्रामसेवक पवनकुमार वाघ,सदस्य आशिष शिंदे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा पाटील गांधली, पिळोदे शिक्षक व बालाजी विद्यालय मुख्याध्यापक सुनील काटे , नरेश पाटील चंद्रकांत निकम,संदीप वंजारी, जयेश लोहार,निलेश निळे, शिक्षिका सुनीता देसले,वर्षा चित्ते,प्रियंका अहिरराव,शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच आधार संस्थेतील प्रतिनिधी आनंद पगारे,दीपक विश्वेश्वर,तोसिफ शेख,बबलू भदाने,दीप्ती गायकवाड,मोहिनी धनगर, उपस्थित होते त्यावेळी ग्रामसेवक पवन कुमार वाघ यांनी बाल विवाह प्रतिबंध होण्यासाठी मार्गदर्शन करून आभार मानले.