अमळनेर : तालुक्यातील देवळी फाटा व पारोळा रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांनी दोघांकडून बळजबरीने पैसे हिसकावून त्यांच्या मोटरसायकलींच्या किल्ल्या देखील लांबवल्याची घटना ६ रोजी सायंकाळी साडे सहा ते सात वाजेदरम्यान घडली.
भटू माणिक पाटील रा दहिवद हे ६ रोजी किराणा सामान मोटरसायकलवर घेऊन जात असताना देवळी फाट्यावर सोहम शाळेच्या जवळ किराणा सामानाची गोणी ढिली झाल्याने ती बांधत असतांना अमळनेर कडून लाल रंगाच्या मोटरसायकलवर दोन जण आले आणि त्यांनी हातातल्या कड्याने कानावर चेहऱ्यावर मारून खिशातील ४ हजार ४०० रुपये व मोबाईल बळजबरीने काढून पाठलाग करू नये म्हणून मोटरसायकल ची किल्ली काढून अमळनेर कडे पळून गेले. अशाच प्रकारची घटना सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पारोळा रस्त्यावर शेख जावेद समा रा गोंधळीवाडा पारोळा यांच्या गाडीचे पेट्रोल संपले असताना अमळनेर कडून दोघे लाल रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच १९ ,५७०७ वरून आले आणि त्यानी जावेद शेख यांच्या खिश्यातून ९ हजार ७०० रुपये मोबाईल आणि मोटरसायकलची किल्ली काढून अमळनेर कडे पळून गेले. दोघांनी केलेल्या आरोपींचे वर्णन सारखे असल्याने दोन्ही ठिकाणी केलेली जबरी लूट त्याच आरोपीनी केल्याचा संशय पोलिसांना असून भटू पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.