अमळनेर-सालाबादाप्रमाणे श्री संत लहरी बाबांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन आज दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून कावपिंप्री येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून महाप्रसादाचे मानकरी श्रीमती इंदूबाई पोपट पाटील व पुरुषोत्तम पोपट पाटील हे आहेत. सदर कार्यक्रम निमित्त रात्री ह.भ.प. उंटावदकर महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी पंच क्रोशीतील सर्व ग्रामस्थ, तसेच बाहेर गावी असलेल्या सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती इंदूबाई पोपट पाटील व माध्यमिक शिक्षक पुरुषोत्तम पोपट पाटील कावपिंप्री यांनी केले आहे.