धुळीने त्रस्त झालेल्या नागरिकांचा संतप्त सवाल…
अमळनेर:- शहारातील ढेकूरोड धुळीने माखला असून गेल्या ४ महिन्यापासून भुयारी गटारीचे सुरू होते. ते पूर्ण होऊन एक महिना झाला पण आता रस्ता तयार करण्याचा मुहूर्त निघत नसल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.
परिसरातील नागरिक रोज सकाळी कामाला जात येत असतांना प्रचंड धूळ उडते. भुयारी गटारीने आधीच पूर्ण वाट लावली. त्यावर माती टाकून जेमतेम रस्ता वापरण्यालायक झाला. मात्र या फोफाट्याने नागरिक त्रस्त आहेत. पूर्ण चेहरा धुळीने माखणे, आणि दिवसभर तसेच राहून नागरिक त्रस्त झाले आहेत. निवडणूक झाली मात्र मुहूर्त मिळेना अशी अवस्था रस्त्याची झाली आहे.
ज्यांना श्वसनाचा विकार आहे. घास,दमा, धुळीने होणारी सर्दी यामुळे श्वसन करण्यास अडचण होत आहे. मात्र प्रकाराकडे तब्बल १ महिन्यापासून कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे मात्र तोंडाला मास्क लावावे लागत आहेत. अनेक जण रुमलाचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत. मात्र याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय आहे. त्यात एक कार्यकारी अभियंता, दोन उपविभागीय अभियंता कार्यालये याठिकाणी असून असून देखील ते डोळ्यावर पट्टी बांधून वापरत आहेत. मात्र त्यांनी कधीही ठेकेदाराला सूचना केली नाही. निवडणूक झाली, गटारीचे काम झाले पण रस्ता तयार होईना अशी स्थिती आहे. अशाही अडचणीत सध्या नागरिक आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते अद्याप मौन सोडत नसल्याने ही ढेकूरोड वासीयांची अडचण झाली आहे.
प्रतिक्रिया
गेल्या महिनाभरापासून या गटारीचे काम झाले आहे. मात्र रस्त्यावर माती टाकली असून पूर्ण धुरळा उठतो त्यामुळे घसा विकार श्वसन विकारांचा त्रास रस्त्यावर असणाऱ्या सर्व नागरिकांना आहे. – राहुल येवले, नागरिक ढेकूरोड
प्रतिक्रिया
आमचे भुयारी गटाराचे काम पूर्ण आटोपले. आता त्याचे काम आहे. आमची काम सर्व पूर्ण करून झाले आहे. आमची जबाबदारी संपली आहे. याबाबत तुम्ही बांधकाम खात्याशी संपर्क साधावा. – शाखा अभियंता, संतोष चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
प्रतिक्रिया
याला भुयारी गटार वाल्यांचे डांबरी सरफेस करून देण्याची जबाबदारी होती. मात्र त्यांनी करून दिले नाही. अंदाजपत्रकात त्याची तरतूद नाही. मात्र मी वरिष्ठांशी चर्चा करून यावर निर्णय घेतो. जे टेंडर मंजूर झाले होते. त्याप्रमाणे आता रस्ता नाही मात्र काहीतरी मार्ग काढून हे काम पूर्ण करावे लागेल – हेमंत महाजन, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम.