अमळनेर:- येथील प्रल्हाद बाविस्कर व माजी नगरसेविका लक्ष्मीबाई बाविस्कर यांच्या आशीर्वादाने यांचे सुपुत्र संजय बाविस्कर, विजय बाविस्कर यांच्या दातृत्वाने अंबऋषी टेकडीवर 22 फुटी श्री श्रीराम भक्त हनुमानाची मूर्ती मूर्ती विराजमान झाली. दूर दूरचे भाविक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. बाविस्कर परिवाराकडून नुकतीच अंबऋषी टेकडीवर म्हणून ओपन जिम उभारण्यात आली आहे.
रविवारी या ओपन जिमचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष व पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या हस्ते व मोती काका जैन, हेमंत पाठक, भदाणे दाम्पत्य, दिलीप सोनवणे, डॉ. राजेंद्र पिंगळे, डॉ. राजेंद्र सोनार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिमच्या साहीत्याची पूजा विधी बनतोडे महाराज यांनी केली. याप्रसंगी सुभाष चौधरी डॉक्टर राजेंद्र पिंगळे हेमंत पाठक दिलीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत बाविस्कर परिवाराच्या दातृत्वाचे अमळनेरच्या जनतेतर्फे कौतुकच केले व इतरांनी सुद्धा त्यांच्या आदर्श घ्यावा असे आवाहन केले. अनेक दातांच्या देणगीतून अंबऋषी टेकडी मानवनिर्मित जंगल उभे राहिले आहे. या कार्यक्रमा साठी लोटन पाटील, सतिष देशमुख, धिरज चांदवाणी आणि श्री.अंबर्षि टेकडी वृक्ष संवर्धन गृपचे सदस्य नरेश कांबळे, रमेश कंजर, भावसार सर, गौरव चौधरी,भरत सैंदाणे, सुरेश भावसार,आशिष चौधरी, योगेश येवले ,संजय पाटील,गणेश पाटील,विनोद थोरात.हेंमत महाले,दिपक मोरे,राजु मोरे इ.कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.