अमळनेर :- तालुक्यातील कळमसरे ते शहापूर रस्त्याचे पूर्णता तीन तेरा वाजले असताना या रस्त्याकडे जबाबदार अधिकारी यांनी गेल्या तीन वर्षात ढुंकूनही पाहिले नसल्याने रस्त्याच्या दोन्हीही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने सिंगल वाहन चालविणे कठीण झाले आहे.
कळमसरे ते शहापूर या पाच किलोमीटर रस्त्याचे काम टप्या-टप्प्याने होत असल्याने हा रस्ता दुर्लक्षित झाला आहे. या रस्त्यावर कळमसरे पासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूला काटेरी झूडपांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता पूर्णता झाकाळला गेला आहे. दिवसेंदिवस हा रस्ता काटेरी झूडपांच्या विळख्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काटेरी झूडपांच्या वाढलेल्या अतिक्रमणाने वाहन चालविणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या मध्यभागी काटेरी झुडपे आल्याने पुढे रस्ता आहे की नाही,हेच समजत नाही. गेल्या वर्षातच यार रस्त्यावर काटेरी झुडपे वाढलीअसल्याने जबाबदार अधिकारी या रस्त्याकडे पाहायला तयार नाही. गावाकडून एक किलोमीटर रस्ता तयार केला गेला त्यानंतर दोन किलोमीटर करण्यात आला. मात्र शहापूर ते कळमसरे एकूण पाच किलोमीटर अंतर या रस्त्याचे असून एकही वेळा हा रस्ता एकाच टप्प्यात तयार करण्यात आला नाही. पूर्वी झालेले कामात आजही मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दिवसातून चार वेळा धावणारी एस टी वाहन बंद पडले आहे. रस्त्याचे काम तर काही या तीन वर्षात झाले नाही. मात्र हा रस्ता शेत रस्ता म्हणून उरला असल्याची प्रचिती शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. काटेरी झुडपे तात्काळ काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी होत आहे.