अमळनेर : ढेकू रस्त्यावरील फुटपाथ झुडुपानी झाकले गेल्याच्या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने फुटपाथच्या साफसफाईला सुरुवात केली आहे
ढेकू रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर फुटपाथ बांधण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षित फिरता यावे यासाठी फुटपाथ करण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून फुटपाथ झुडुपांमुळे झाकले गेले होते. फुटपाथवर चालणे मुश्किल होते. त्यामुळे खाली रस्त्यावर चालावे लागत होते तेथेही गवत वाढल्याने अपघाताची भीती होती. याबाबत पत्रकारांनी आवाज उठवला होता. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भागवत माळी यांनी फुटपाथची साफसफाई करणे सुरू केले.