अमळनेर:- शहरातील मुंबई गल्ली परिसरात बंद घरचे छत कोसळून पडले. त्यात पडलेल्या कुत्र्याच्या दोन पिल्लांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
प्रीतपालसिंग बग्गा यांच्या जुन्या घराचे छत कोसळले होते. त्यामुळे त्यात कुत्र्याचे दोन पिल्लू खाली पडले. बंद घरामुळे ते बाहेर काढता येत नव्हते. मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळवल्यावर अग्निशमनदल प्रमुख गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश बिऱ्हाडे , जफर पठाण , आनंदा झिम्बल , आकाश संदानशीव ,आकाश बाविस्कर यांनी सीडी लावून खाली उतरले आणि दोन्ही पिल्लांचे प्राण वाचवले.