नागरिकांनी सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे आवाहन
अमळनेर : शहराच्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेच्या सर्वेक्षण आणि काही ठिकाणी कामाला सुरुवात झाली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे.
आमदार अनिल पाटील यांनी मंजूर केलेली २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथून करण्यात येणार आहे. शहरात कोठून कोणत्या मापाचे पाईप घ्यावे याचे सर्वेक्षण आहे.
मात्र काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते झाल्यास पुन्हा पाईप लाईन साठी रस्ते फोडल्यास नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होईल म्हणून पैशांची बचत होण्यासाठी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी आता सुरू असलेल्या रस्त्यांवर आधी पिण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला उशीर होऊ शकतो , अनेक ठिकाणी भुयारी गटार व नळ कनेक्शन अंडरग्राऊंड वायर तुटू शकते. भविष्यातील समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नागरिकांनी त्रास सहन करावा म्हणजे पाईप लाईन आणि त्यापाठोपाठ रस्तेही होतील असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे.
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथून २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेमुळे अमळनेर शहराची पाणी समस्या अनेक वर्षे उदभवणार नाही. शहराची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे.