
अमळनेर:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित विभागीय शिक्षक व्हॉलीबॉल स्पर्धेत जळगाव जिल्हा शिक्षक संघाने अंतिम सामन्यात नंदुरबार संघावर विजय मिळवल्याने जळगाव संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या या व्हॉलीबॉल संघात अमळनेर तालुक्यातील निंभोरा जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका मोहिनी राहुल पाटील यांचा समावेश आहे,
मोहिनी पाटील यांच्यासह महेंद्र म्हैसरे (चोपडा), वृषाली पाटील (चोपडा),मंगल म्हेत्रे (जामनेर), डॉ. कांचन विसपुते (जळगाव), वंदना भालशंकर (मुक्ताईनगर) क्षितिज सोनवणे (जळगाव), प्रशांत पाटील (चाळीसगाव), भूषण पवार (धरणगाव),यांचा संघात सहभाग आहे. दरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाल्याने मोहिनी पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होतं आहे मोहिनी पाटील या साने गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक राहुल पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत

