
अमळनेर : तालुक्यातील लोण खुर्द येथे नवजात अर्भक मृत व लचके तोडलेल्या अवस्थेत फेकून दिल्याची घटना ११ रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली.
लोण खुर्द येथील पोलिस पाटील उदय निंबा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, एक नवजात अर्भक अमळनेर मुडी रस्त्यावर कैलास भगवान पाटील यांच्या बंद घराजवळ फेकलेले आढळून आले. त्याचे पोटाचे लचके तोडलेले आढळून आले. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मारवड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
