अमळनेर:- तालुक्यातील भोरटेक ते अमळनेर रेल्वे मार्गावर एक मृतदेह आढळला असल्याची खबर स्टेशन मास्टर यांनी मारवड पोलीसात दिली आहे.
भोरटेक स्टेशन अधीक्षक रंजीत कुमार गुप्ता यांनी मारवड पोलीसात दिलेल्या खबरीनुसार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ९:४५ वाजता माहिती मिळाली की, अमळनेर ते भोरटेक दरम्यान अप लाईनवर ट्रॅकच्या खाली एक इसम मृतावस्थेत आढळला आहे. दरम्यान सदर इसमाची ओळख पटली असून त्याचे नाव दिगंबर उग्रशेन मोहंता असे असून तो सरिया, मयुरभांज, ओडिसा येथील राहणार असल्याचे समजले आहे. पुढील तपास पो. ना. सुनील तेली हे करीत आहेत.