वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात…
अमळनेर:- शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ चौफुलीवर ट्रॅफिक पोलीस नसल्याने चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला आहे. यामुळे अपघात वाढत असून रस्त्यावर चौफुली असल्याने व दोन शाळा असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असतो.
शहरातील स्वामी समर्थ मंदिर प्रवेशद्वार या चौकालगत डी आर कन्या शाळा, जी एस हायस्कुल, इंदिरा गांधी शाळा, मुंदडा माध्यमिक विद्यालय अशा चार शाळेतील मुले रस्ता क्रॉस करतात याचा विचार न करता शिवाय अवजड वाहतूक या रस्त्याने वाढली आहे. रस्त्यावर दिपनगर कडून येणारे असून राखेचे ट्रक निरंतर वापरतात. याशिवाय खडी, रेतीचे डंपर देखील वापरतात यामुळे विद्यार्थी जीव मुठीत घालून रस्ता ओलांडतात याठिकाणी चौफुलीवर ट्रॅफिक पोलिस नसल्याने गोंधळ उडतो व किरकोळ अपघात प्रमाण वाढले आहे.
ज्यावेळी शाळा भरते आणि सुटते त्यावेळी पायी, सायकली घेऊन विद्यार्थी निघतात, मोटारसायकल चालक तीन चाकी वाहने यामुळे मोठा गोंधळ उडतो व यावेळी तीव्र वाहतूक ठप्प होते. तब्बल १५ मिनिटे कोंडी सुरु असते. याकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे त्याठिकाणी ट्रॅफिक पोलिस उभे करून अवजड वाहने बाहेरूनच दुसऱ्या मार्गाने न्यावित अशी मागणी होत आहे.